बशीरसाब फरीद शेख यांचे निधन
निटूर: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे हलकी येथील बशीरसाब फरीद शेख वय वर्ष अंदाजे 98 यांचे दि. 14 जानेवारी वार रविवार दुपारी 1:00 वाजता वृद्धापकाळाने निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांचावर दि. 14 जानेवारी वार रविवार सायंकाळी 6:00 वाजता(बाद नमाज-ए-असर) हलकी कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. ते पीरपाशा शेख(सुपर टेलर, निटूर) यांचे वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments