Latest News

6/recent/ticker-posts

सब-ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

सब-ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

लातूर: दि 14 जानेवारी बालेवाडी पुणे येथे दि 18 ते 20 जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या 33 वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला असुन हि निवड चाचणी स्पर्धा काल दि 13 जानेवारी रोजी सायंकाळी श्री केशवराज विद्यालय येथे पार पडली. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध अकॅडमीतून 52 खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. 28 वजनीगटापैकी 19 वजनीगटात खेळाडूंच्या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायक्वांदो पंच नेताजी जाधव यांच्या हस्ते पार पडले तर पदक वितरण सत्येंद्र नागटिळक, अभिषेक शर्मा, आसिफखान पठाण, सौ माले, सौ कांबळेबव सौ खडबडे यांच्या हस्ते पार पडले.

निवड झालेल्या विजेत्या खेळाडुत श्री राजानारायनलाल लाहोटी शाळेची २० ते २२ किलो वजनी गटात कु माहिरा इसरार सगरे व २७ ते २९ कि आदिती कमल अग्रोया, श्री बंकटलाल लाहोटी शाळेतील ३२ ते ३५ कि श्रावणी सुरज कोकणे, ३८ ते ४१ कि शरयु प्रशांत लाहोटी, ३५ ते ३८ कि श्रृष्टी मनोज भुतडा,२३ ते २५ कि वरुण विकास शिंदे, २९ ते ३२ कि आर्यन नागटिळक, ४१ ते ४४ कि क्षितिज ललित बिदरकर, ५० कि वरील आयान आसिफखान पठाण, ३८ ते ४१ कि पार्थ गोविंद साबदे, ५० ते ५५ कि आदित्य अभिषेक शर्मा, श्री केशवराज विद्यालयाचे २४ ते २६ कि विवांशी श्यिम अंदुरे,२९ ते ३२ कि श्रिया शिवाजी कदम, ४७ ते ५२ कि आरोही मंचक राऊतराव, २७ ते २९ कि आशुतोष कांबळे, २५ ते २७ कि श्रीगणेश संजय खडबडे, विद्याविकास शाळेतील ४१ ते ४७ कि स्वराली विशाल देशपांडे पोदार इंग्लिश स्कुलची ४७ कि वरील आद्या प्रशांत माले तर संत तुकाराम इंग्लिश स्कुलचा ४४ ते ५० किलो वजनी गटात अब्राहम इम्रान सय्यद याची निवड करण्यात आली आहे.

जिल्हास्तर निवड चाचणीतून निवडलेल्या खेळाडुंचे बंकटलाल लाहोटी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बुक्कावार, उपमुख्याध्यापक वैभव पोतदार, केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी राजानारायनलाल लाहोटी स्कुलचे रजिस्टार प्रविण शिवणगिकर पोदार इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक गिरीधर रेड्डी, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, नाना लिंगे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, अमर केंद्रे तायक्वांदो संघटना पदाधिकारी प्रयागराज गुरुड, सुनिल मुनाळे, गणेश इगवे व नेताजी जाधव यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणुन एस व्ही कुलकर्णी, जान्हवी मदने आसावरी कुलकर्णी, प्रेरणा सोरडे, अनुश्री कुलकर्णी यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी अनिकेत बिरादार, सानवी कदम व सृष्टी कांबळे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments