अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
देवणी: (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) आज दिनांक 03/01/ 2024 रोजी श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगाव या ठिकाणी अनुभव शिक्षा केंद्र लातूरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थिनींनी भाषण करत असताना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे आचार विचार स्त्रियांच्या व मुलींच्या हक्क आणि अधिकार स्वातंत्र व शिक्षणाचे बाळकडू पाजण्यासाठी त्यांचा संघर्ष यावर भाष्य केले याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य रामलिंग मुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बंडगर, हरिभाऊ परीट, उषाताई, वरून सुर्यवंशी हे होते.
यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक महादेव कोटे, जिल्हा संघटक विक्रम गायकवाड, अरुण पाटील, प्रसाद चव्हाण, सिद्धेश्वर मिरचे, प्रणव बिरादार, शेट्टीबा पवार व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना साऊ हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले.
0 Comments