Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथील अल फारुख उर्दू विद्यालयात स्वयंशासनदिन

नळेगाव येथील अल फारुख उर्दू विद्यालयात स्वयंशासनदिन


नळेगाव: येथील अल फारुख उर्दू विद्यालयात सोमवारी (दि.15) दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासनदिन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक म्हणून घोरवाडे चाहत अमीर, लिपिक म्हणून मुजावर नेहा गफ्फार व बागवान इब्राहिम अली शेर यांनी सेवक म्हणून काम पाहिले. शिक्षक म्हणून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वहाब जागीरदार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कादिर जागीरदार, मुजीब शेख, समद शेख यांनी मार्गदर्शन केले. हुसेन घोरवाडे, युनूस शेख, इस्माईल सय्यद यांनी परीक्षण केले.

स्वयंशासनदिनाच्या यशस्वीतेसाठी हाश्मी मोईनोद्दीन, इरशाद पिरजादे, कासिम शेख, लायक सौदागर, मुंजेवार बाबू, साहेबलाल कुरैशी, इलियास शेख, नुरोद्दीन तांबोळी, फय्याज सय्यद सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व दहावीच्या विधार्थ्यांनी परिश्रम घेतली.

Post a Comment

0 Comments