मांजरा नदीवर साकारला जातोय अद्दयावत तंत्रज्ञानाने पुल
निटूर: मांजरा नदीचे पात्र भरुन असताना अद्दयावत तंत्रज्ञानाने गिरकचाळ येथे पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. सत्यसाई इन्फ्रा वेंचर्स,लातुर या कंपनीला हे कंत्राट मिळाले असुन पुलाचे आणी रस्त्याचे काम वेगात सुरु आहे. समुद्राच्या खाडी भागात वापरले जाणारे तंत्रज्ञान या पुलासाठी वापरले जात आहे. पाण्यामध्ये मुरुमाचा भराव टाकुन त्यावर कन्वेशनल पध्दतीने (conventional method) पायाचे काम सुरु आहे.
पावसाळ्यापुर्वी नदीपात्राच्या वर कॉलमचे बांधकाम येईल असे कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विशाल मुगळे यांनी प्रतिनिधीस सांगितले. या पुलामुळे दळणवळण वाढुन या भागातील व्यवहार वृध्दिंगत होईल. लातूर आणी उदगीर बाजारपेठांना जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे या भागातील शेतकरी सधन होईल असे हेळंब सरपंच प्रतिनिधी सोपान सिरसे यांनी सांगितले.
0 Comments