शालेय राज्य तायक्वांदो स्पर्धेत पुणे अव्वल तर कोल्हापुर दुसर्या व मुंबई विभाग तिसऱ्या स्थानावर
लातूर: दि २४ डिसेंबर क्रीडा व युवक सेवा संचालनालय द्वारा आयोजित लातूर येथील राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पुणे विभाग अव्वल तर कोल्हापूर दुसर्या व मुंबई विभाग तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. दि २१ ते २४ डिसेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील आठ विभागातील ६९ वजनीगटात १४, १७ व १९ वयोगटातील ६०० खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन शिव छञपती पुरस्कर्ते मिलींद पठारे यांच्या हस्ते झाले तर समारोपप्रसंगी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी उपस्थिती लावली होती. क्रीडा संचालक कार्यालयाने नियक्त केलेल्या स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख शिवछञपती पुरस्कर्ते प्रविण बोरसे, डाॅ अविनाश बारगजे व प्रमोद दौंडे यांनी तांत्रिक बाजु सांभाळली यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तायक्वांदो राज्य संघटनेचे पदाधिकारी संदिप ओंबासे, गफार पठाण, सुभाष पाटील, व्यंकटेश कर्रा, शिवाजी चव्हाण यांनी भेट देऊन खेळाडुंना शुभेच्छा दिल्या आहेत.
तायक्वांदो दोन राज्य संघटना स्थित असल्यामुळे या राज्य स्पर्धेचे आयोजन कोण करणार असा प्रश्न क्रीडा संचालक कार्यालयासमोर होता पण खेळाडुंचे हित विचारात घेता राज्याचे क्रीडा मंञी संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा लातूरात आयोजित करुन निर्विवाद यशस्वी पार पडल्या आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे राज्यातून कौतुक होत आहे. स्पर्धा आयोजनात लातूर पोलीस विभाग, पोदार इंग्लिश स्कुल लातूर, पार्वती स्पोर्ट्स कराड, महात्मा बसवेश्वर महादेवी मुलीचे वस्तिगृह, लातुरातील तायक्वांदो खेळाडुंचे पालक व होनराव सरांचे रिलायन्स पॅटर्न यांचे सहकार्य विशेष लाभले.
सुवर्ण पदक विजेते खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे तर मध्य प्रदेशातील बैतुल येथे दि २ जानेवारीपासून राष्ट्रीय स्पर्धा पार पडतील. विजेत्या खेळाडुमधे १४ वयोगटातील विविध वजनी गटात प्रियंका वाबळे, अनन्या रणसिंगे, वैष्णवी बेरड, शालिनी चंदनशिवे, सलोनी प्रसाद, सृष्टी वाईगुंडे, रिया भटेकर, आदिती धावडे, स्वरा नितोरे, अक्षरा शानबाग, वेदांत मगदुम, मनजोत सिंग, हिमांशु खडगी, सार्थक निमसे, हर्षल रक्षा, आर्यन पिंपळकर, प्रसाद पारेकर, श्रवण तांबरे, प्रणव भकते, आयुष वाघमारे, अभिमन्यु पांडे, १७ वयोगटातील मयुरी धुमाळ, श्रावणी घाणेकर, दिक्षा गायकवाड, समृद्धी यादव, ञिशा मयेकर, वैष्णवी पाटील, तनिष्का काळे, श्रद्धा वालेकर, तनुजा पवार, श्रेया कुंभार, तनया आवटे, सिद्धी बेंडाळे, सुहानी ठनाल, गोपाल पोटे, देवदत्त चव्हाण, अनुप गायकवाड, आयुष सोनवणे, ओम बोरसे, अश्वेत जाधव, आर्यन राऊत, निपुण पोकळे, विश्वजीत वायगडे, अनिरुद्ध वाघमारे, अदिश देवरे, नावेद खान, रोहन वांजळे
तर १९ वयोगटातील आदिती भाटे, अनुजा पाटील, निलम जोशिकर, स्नेहल वांजळे, नेहल जैन, श्रुतिका टकले, नयन बारगजे, तन्वी जागडे, गौरी कुमावत, श्रावणी झिंगाडे, सोनिया सोळंके, रेहान गुडूरे संस्कार औताडे, रैयान तांबोळी, सार्थक हांडे, प्रिन्स शर्मा, मयुर मडसनाळ, कृष्णा मिश्रा, वेदांत सावंत, अभिषेक सुकळे, ऋत्विक कोतकर हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. स्पर्धा आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनात क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी तायक्वांदो जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव, कोषाध्यक्ष प्रयागराड गरुड, धाराशिव जिल्हा सचिव राजेश महाजन, क्रीडा शिक्षक आरती नागराळे, रुपाली कांबळे, राष्ट्रीय पंच एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, जान्हवी मदने, अनुश्री कुलकर्णी, आसावरी कुलकर्णी, प्रेरणा सोरडे, अदिती मेनकर, अनिकेत बिरादार, श्लोक पडिले, सानवी कदम, दुर्वा बिडवे, स्वरा देशपांडे, स्वप्नील मुळे व बबन सुळे यांनी काम पाहिले.
0 Comments