आधुनिक लहुजी सेनेच्या निलंगा तालुकाअध्यक्ष पदी सुनील काळे यांची निवड
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) मातंग समाजाच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी काम करत असलेली लहुजी सेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक २१ डिसेंबर रोजी औसा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीला जिल्हा भरातून संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत मातंग समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा व संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी यांचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला सुयोग्य दिशा देण्यासाठी व चळवळ गतिमान करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला. यावेळी नगिनाताई कांबळे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या अतिशभाऊ पाटोळे(जिल्हाध्यक्ष), अमरभाऊ शिंदे(जिल्हाध्यक्ष को.क.), अमरभाऊ कांबळे(जिल्हाध्यक्ष यु.), सोमनाथभाऊ शिंदे(जि. उपाध्यक्ष), दशरथभाऊ शिंदे(जि. उपाध्यक्ष), सुमनताई कांबळे(जि. उपाध्यक्ष म.आ.), सुनीलभाऊ काळे (निलंगा तालुकाध्यक्ष), विक्रमभाऊ रनसिंगे(औसा यु. तालुकाध्यक्ष) आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. ही बैठक यशस्वी होण्यासाठी मराठवाडा युवक अध्यक्ष बल्लीभाऊ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष पिंटूभाऊ कांबळे सह अनेक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments