Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेकरिता शुभम बोडके यांची निवड

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेकरिता शुभम बोडके यांची निवड

लातूर: दि. 23 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, इनडोअर हॉल, नांदेड येथे झालेल्या शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बोरोळ सेल्फ डिफेन्स मल्टीपर्पज अकॅडमीचा खेळाडू व कै. यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरोळ येथील विद्यार्थी शुभम आत्माराम बोडके 19 वर्षाखालील मुले मध्ये सुवर्णपदक मिळवले. त्याची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडूंला प्रशिक्षक विश्वजीत येनकुरे यांचे मार्गदर्शन लाभले. रुरल अँड अर्बन किक बॉक्सिंग असोसिएशन लातूर अध्यक्ष कय्युम तांबोळी, सचिव के वाय पटवेकर, विक्रम गायकवाड, कालिदास गायकवाड, संतोष तेलंगे, सरपंच कृष्णा पाटील, प्राचार्य सतीश शेंडगे, प्रदीप पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments