सामाजिक उपक्रम राबवून मित्राच्या लग्नाचा रौप्य महोत्सव लातूरात साजरा
लातूर: पुणे येथे स्थायिक झालेले पण लातूरच्या व्यंकटेश विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेले सुप्रसिध्द उद्योजक वेदप्रकाश शर्मा यांच्या लग्नाचा रौप्य महोत्सव आज लातूर शहरात त्यांच्या वर्गमित्रांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.
व्यंकटेश विद्यालयात १९९० मध्ये १० वी वर्गात शिक्षण घेतलेल्या विदयार्थी आणि विद्यार्थिनी यांनी एकत्र येत "भेटी लागे जीवा" हा समूह तयार केला आहे. या समूहात तब्बल १८० मित्र मैत्रिणी सहभागी आहेत. आज या समूहातील वेदप्रकाश शर्मा यांच्या विवाहाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भेटी लागे जीवाच्या वतीने शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले तर स्क्रॅप मार्केट परिसरात असलेल्या गोरक्षण येथे जाऊन गोमातेची सेवा करण्यात आली.
अनावश्यक खर्च टाळत, पैशांचा अपव्यय न करता भेटी लागे जीवा हा समूह आपल्या मित्रांचे वाढदिवस, लग्न वर्धापनदिन समाजपयोगी, दिशादर्शक उपक्रम राबवून मित्राच्या आनंदात सहभागी होत आहेत.
0 Comments