लातूर पोलीस मॅराथॉन-2023 निमित्त रविवारी सकाळी 6 ते 8 पर्यंत वाहतूक मार्गांमध्ये बदल
लातूर:(जिमाका) दि. 01 शहरात रविवार, 3 डिसेंबर2023 रोजी लातूर पोलीस दलातर्फे लातूर पोलीस मॅराथॉन-2023 याचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व तरुण मुले व्यसनापासून दूर राहण्यासाठी ‘चला चांगले छंद जपुया’ हा संदेश देण्यासाठी जिल्हा क्रिडा येथून रविवारी सकाळी 5 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शहरातील काही वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
मॅराथॉनला जिल्हा क्रिडा संकुल येथून प्रारंभ होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक-अशोक हॉटेल-मिनी मार्केट-गांधी चौक-हनुमान चौक-गंजगोलाई येथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक-दयानंद गेट-संविधान चौक-एक नंबर चौक ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा क्रिडा संकुल ते नंदी स्टॉप-आदर्श कॉलनी-राजीव गांधी चौक आणि परत क्रीडा संकुल अशा मार्गावरून जाणार आहे. या मार्गावर स्पर्धक रोडचे एका बाजुचे मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे शहरातील जनतेच्या सोयीच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कळविले आहे.
वाहतुकीस बंद असणारे मार्ग
महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई या मॅराथॉन मार्गावर सर्व वाहनांस वाहतुकीसाठी बंद राहील.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंजगोलाई हा मार्ग एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इत्यादी जड वाहतुकीसाठी बंद राहील.
जड वाहनांना पर्यायी मार्ग
बार्शी रोडवरून शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. 2 चा वापर करतील. बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.
औसा रोडने शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस या जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. 2 चा वापर करतील. बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.
रेणापुर रोडने शहरात येणाऱ्या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील. रेणापुर रोडने येणारी चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने ही जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्ली या मार्गाचा वापर करतील.
छत्रपती शिवाजी महाराज चौक-अशोक हॉटेल-गांधी चौक या मार्गावर केवळ दुचाकी, तीनचाकी वाहने जातील.
जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोडचा
गांधी चौक ते बस्वश्वेर महाविद्यालय - रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉज.
जुना रेणापुर नाका बसस्थानक येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व बसेस परत त्याच मार्गे जातील.
0 Comments