Latest News

6/recent/ticker-posts

लातूर येथे 10 वी IFSKA आमंत्रित खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

लातूर येथे 10 वी IFSKA आमंत्रित खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

लातूर: इंटरनॅशनल फुनाकोशी शोटोकान कराटे असोसिएशन द्वारा आयोजित दहाव्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धा श्रीमती सुशीलादेवी देशमुख इंडोर हॉल, लातूर येथे 17 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या

या स्पर्धा काता व कुमिते या दोन खेळ प्रकारांमध्ये वेगवेगळ्या वजन व वयोगटात घेण्यात आल्या. कोल्हापूर, परभणी, नांदेड, सोलापूर, बीड सह राज्यभरातून 600 पेक्षा जास्त खेळाडूने सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी लटके, सिने अभिनेते रविकुमार शिंदे, प्रदीप माने, रफिक सय्यद, अनुराधा थोरात, एकनाथ पाटील हे उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून संदीप पवार, विशद कांबळे, मुबशीर सय्यद, रेहान शेख, मुजाहिद सय्यद, आरती कस्तुरे, प्रगती जाधव, रेश्मा सूर्यवंशी, मनसर्वी कांबळे, रोहन सूर्यवंशी, आतिक पटेल, हर्ष भोसले, केशव कांबळे, विजय गवारे यांनी काम पाहिले.

अजित ढोले यांनी केले तर आभार सदर असोसिएशनचे अध्यक्ष तथा स्पर्धा मुख्य आयोजक शिहान आजमीर बी. शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments