Latest News

6/recent/ticker-posts

जागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त रुग्णांना रक्ततपासणी दरात सवलत

जागतिक पॅथॉलॉजी दिनानिमित्त रुग्णांना रक्ततपासणी दरात सवलत


सतीश तांदळे

लातूर
: जागतिक पॅथॉलॉजी दिनाचे औचित्य साधून पॅथॉलॉजी व मायक्रोबाॅयलाॅजीअसोसिएशन, लातूरच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून यात प्रामुख्याने ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत लातूर मधील नामवंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये सवलतीच्या दरात सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत.

जागतिक पॅथॉलॉजी दिन हा दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील दुसर्‍या बुधवारी पॅथॉलॉजी या शाखेचे आधुनिक वैद्यकशास्त्रात रोगाच्या निदान, उपचारात असणारे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. या वर्षी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पॅथॉलॉजी व मायक्रोबाॅयलाॅजी असोसिएशन, लातूरच्या वतीने हाॅटेल ॲरोमा येथे साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य आयएमए चे अध्यक्ष डाॅ रविंद्र कुटे यांच्या हस्ते होणार आहे. आयएमए चे राज्य उपाध्यक्ष डाॅ रमेश भराटे, आयएमए लातूरचे अध्यक्ष डाॅ अनिल राठी, डाॅ अशोक पोतदार, डाॅ आशिष चेपुरे, डाॅ सचिन इंगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पॅथॉलॉजी असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत यात प्रामुख्याने ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत लातूर मधील नामवंत पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासण्या वर सवलत देण्यात येणार आहे. संघटनेच्या वतीने दि ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित सोहळ्यात लातूर शहरातील जेष्ठ पॅथॉलॉजिस्ट यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा आदि क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट यांचा ही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील आदर्श पॅथॉलॉजी लॅब, सिद्धेश्वर पॅथॉलॉजी लॅब, अविष्कार पॅथॉलॉजी लॅब, निर्णय डायग्नोस्टिक सेंटर, स्वरा पॅथॉलॉजी लॅब, निदान डायग्नोस्टिक सेंटर, सिट्रस डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, ओमसाई पॅथॉलॉजी लॅब, सुरभी पॅथॉलॉजी लॅब, अन्वी पॅथॉलॉजी लॅब, कृष्णा सर्जिकल पॅथॉलॉजी, वरद पॅथॉलॉजी लॅब, राठी पॅथॉलॉजी लॅब, श्री श्री पॅथॉलॉजी लॅब, रेणुकाई पॅथॉलॉजी लॅब, श्रीराम पॅथॉलॉजी लॅब, मथुरा डायग्नोस्टिक सर्विसेस, आदित्य पॅथॉलॉजी लॅब, प्रिया पॅथॉलॉजी लॅब, शुभम पॅथॉलॉजी लॅब या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सवलतींचा जनतेने लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संबंधित लॅबोरेटरीशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments