गरजूंना अन्नदान करून मित्रांनी केला वाढदिवस साजरा
लातूर: येथील तरुण व्यापारी तथा उद्योजक राजेश मुंदडा यांचा जन्मदिन त्यांच्या शालेय मित्रांनी शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरा केला. भेटी लागे जीवा हा व्यंकटेश विद्यालयातील १९९० सालच्या १० वी वर्गाचा समूह आहे.
भेटी लागे जीवा या समूहात तब्बल १८० शालेय मित्र आणि मैत्रिणी आहेत. आज राजेश मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त या समूहाने समर्पण फाऊंडेशनच्या सहकार्याने शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करून साजरा केला. याप्रसंगी अनेक मित्रांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होत आपल्या बालमित्राचा जन्मदिन साजरा करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments