Latest News

6/recent/ticker-posts

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी रामदास भाेसले यांची निवड

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी रामदास भाेसले यांची निवड


लातूर: जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असाेशिएशनच्या अध्यक्षपदी रामदास भाेसले तर सचिव पदी अरुण साेमाणी यांच्यासह इतर पदाधिकारी यांची लातूर येथे रविवारी औषधी भवन येथे पार पडलेल्या निवडणूकीत बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मधुसुदन झंवर यांनी जाहीर केले आहे.

असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी ओम बाहेती, अनिल स्वामी, धनंजय जाेशी, सत्यवान बाेराेळकर, राजकुमार साेनटक्के यांची तर काेषाध्यक्षपदी अतुल काेटलवार, सहसचिव ईश्वर बाहेती, अंकुश भाेसले, प्रकाश साखरे, संगमेश्वर निला, संघटन सचिव पदी रमेश भांगडिया, नागेश स्वामी, दिपाली सासवडे, नाथराव मुंडे, जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रकाश रेड्डी, बालाजी थेटे, रमाकांत बुरकापल्ले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असाेशिएशन उपाध्यक्ष अरुण बरकसे, मराठवाडा झाेन अध्यक्ष दिपक काेठारी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर जाधव पाटील,आप्पासाहेब घुगरे, बाबुराव महाजन, श्रीकांत वाघमारे उपस्थित हाेते.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी औसा तालुका अध्यक्ष संजय भालकीकर, उदगीर केमिस्ट संघटनेचे प्रशांत हरमुंजे, पियुष लाेहिया, रवि दरक, उमाकांत पाटील देविदास सुरवसे, मनाेज आगासे आदी केमिस्ट बांधव उपस्थित हाेते.

Post a Comment

0 Comments