निटूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातूर: निलंगा तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट व निटूर महसूल मंडळ पंचवीस टक्के (25% ) ॲग्रीम रक्कम विमा वाटपातून वगळले आहे ते समाविष्ट करणे व डोंगरगाव धनेगाव बॅरेजचे पाणी शेतकऱ्यांच्या जलसिंचनासाठी ठेवणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सन 2023 - 2024 मध्ये खरीप हंगामामध्ये सलग चाळीस दिवसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे व शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे यात शासनाने निलंगा तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळले व निटूर महसूल मंडळ पंचवीस टक्के (25%) ॲग्रीम रक्कम वगळून शेतकऱ्यावर मोठा अन्याय केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा तर गेलाच पण दिवाळीही गोड होणार नाही तरी शासनाने 25% ॲग्रीम रक्कम विमा वाटपात घेऊन दिवाळीपूर्वी विम्याचे वाटप करावे व असा दुहेरी अन्याय निटूर महसुल मंडळावरती करू नये व शेतकऱ्यावरील अन्याय दूर करावा अन्यथा शेतकरी आंदोलन करतील असे निवेदनातून सांगण्यात आले आहे. अशा स्वरूपाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी निटूर गटाचे कॉंग्रेस नेते सुरेन्द्र धुमाळ, पंडीत भदरगे, शिंदे मधुकर, चव्हाण गंगाधर, साहेबराव भोयबार, गायकवाड राम, भालचंद्र पाटिल, शेद्रे दतु, जगन सुर्यवशी आदी उपस्थित होते.
0 Comments