Latest News

6/recent/ticker-posts

‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर:(जिमाका) केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने 2019 पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय खेळांचा इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.

यामध्ये 3.25 कोटी रुपयांची बक्षिसे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात येतात. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी ‘फिट इंडिया क्विझ-3’ चे आयोजन करण्यात आले असून यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत https:/fitinida.nta.ac.in या कार्यालयीन संकेतस्थळावर शाळा व विद्यार्थी यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी  ‘फिट इंडिया क्विझ-3’ अंतर्गत विद्यार्थी व शाळांसाठी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण ते राष्ट्रीयस्तरावरील प्राथमिक बक्षीस स्वरुपात 2 हजार ते 25 लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत https:/fitindia.nta.ac.in/ संकेतस्थळावर नोंदणी करून या चाचणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments