Latest News

6/recent/ticker-posts

‌उजेड येथे वाचन प्रेरणा दिन साजरा..... उजेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए पी.जे.अबुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी शाळेतील जेष्ठ शिक्षिका जयश्री कुमदाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला.वाचनाने माणूस समृद्ध होतो.सामान्य कुटूंबातील माणसांनी ज्ञानाच्या बळावर असामान्य कर्तृत्व दाखवल्याची अनंत उदाहरणे आहेत.म्हणूनच आजचा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत.नियमित वाचन करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन केले.बालवाचनालयाची पुस्तके वितरीत करण्यात आली.शाळा प्रांगणातील गर्द वृक्षांच्या छायेत मुलांनी वाचनाचा आनंद घेतला.उपक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास कांबळे,बालाजी शिंदे, संजयकुमार शिंदे, सचिन गुणाले यांनी परिश्रम घेतले.

उजेड येथे वाचन प्रेरणा दिन साजरा


उजेड: येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए पी.जे.अबुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेतील जेष्ठ शिक्षिका जयश्री कुमदाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला. वाचनाने माणूस समृद्ध होतो. सामान्य कुटूंबातील माणसांनी ज्ञानाच्या बळावर असामान्य कर्तृत्व दाखवल्याची अनंत उदाहरणे आहेत. म्हणूनच आजचा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत. नियमित वाचन करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा असे आवाहन केले. बालवाचनालयाची पुस्तके वितरीत करण्यात आली. शाळा प्रांगणातील गर्द वृक्षांच्या छायेत मुलांनी वाचनाचा आनंद घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास कांबळे, बालाजी शिंदे, संजयकुमार शिंदे, सचिन गुणाले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments