Latest News

6/recent/ticker-posts

लातूरच्या गावभागातील महेबूब सुबहानी दर्गा संदल उत्सवात

लातूरच्या गावभागातील महेबूब सुबहानी दर्गा संदल उत्सवात


लातूर: दीडशे वर्षांपासूनची परंपरा असलेला लातूर शहरातील महेबूब सुबहानी दर्ग्याच्या संदल उत्सवात आज 27 ऑक्टोबर रोजी लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सहभागी होऊन सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महेबूब सुबहानी दर्गा संदल उत्सव हा लातूरच्या एकात्मतेच प्रतीक आहे. स्व. बाशुमियाँ मणियार यांच्यापासून सुरू असलेली या संदलच्या मानाची परंपरा राजासाब मणियार, सरफराज मणियार हे पुढे चालवीत आहेत. अशी प्रतिक्रिया  विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक आयुब मणियार, रुमान मणियार, अबेद मणियार आदींची प्रमुख उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments