आयुष्यमान शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी
आभाकार्डचीही नोंदणी; मनपा व दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समितीचा उपक्रम
लातूर: महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व श्री दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने पद्मा नगर येथील दुर्गामाता मंदिरात शनिवारी झालेल्या आरोग्य शिबिरात २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह १७० जणांनी आभा कार्डसाठी नोंदणी केली.
नवरात्र महोत्सवा निमित्त पद्मा नगर भागातील दुर्गा देवी मंदिरात शनिवारी सकाळी आयुष्यमान शिबिर घेण्यात आले. यात नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आरोग्य तपासणीत रक्तदाब, मधुमेह, विविध आजार व रक्ताच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. यात जवळपास २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या वतीने आभा कार्डचीही नोंदणी करण्यात आली. या उपक्रमात १७० नागरिकांनी या कार्डची नोंदणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेच्या डॉ सुनिता कदम, सुपरवायझर एम एम त्रिपाठी, लॅब टेक्निशियन मोनिका कदम, एएनएस एस एस किरवले, महादेवी जागंठे, दीपिका भोरगिर, किरण रणदिवे, अमर धुमाळ, सुमन गायकवाड, आर ए भाईजान, प्रसाद बनसोडे यांच्यासह दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाळणे, सचिव मकरंद कुलकर्णी, विजय खानापूरे, अमोल पोतदार, नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन पेन्सलवार,सचिव संतोष देवडे,अनिरुद्ध भातलवंडे,व्यंकट चामले, किशन ईर्ले, गोविंद पाटील, मिलिंद जेऊरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कुंकूम अर्चनाला महिलांचा प्रतिसाद..
दुर्गादेवी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने कुंकूम अर्चन घेण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यासह नवरात्र निमित्त नियमितपणे होणाऱ्या भजनी कार्यक्रमातही महिलांची सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
0 Comments