Latest News

6/recent/ticker-posts

धनेगाव येथे दोन दिवसीय युवक युवती व पालक मेळाव्याचा शुभारंभ

धनेगाव येथे दोन दिवसीय युवक युवती व पालक मेळाव्याचा शुभारंभ


 
देवणी: (प्रतिनिधी:- विक्रम गायकवाड) अनुभव शिक्षा केंद्र व तसेच श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय युवक युवती व पालक मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य रामलिंगजी मुळे व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून धनेगाव गावाचे सरपंच कुमार पाटील, दिनकर अभंगराव बिरादार, अमीर मोहम्मद सय्यद, शेषेराव शंकरराव बंडगर, संगप्पा चरपले, व्यंकटराव बिरादार, सरस्वती शिंदे, दीपक देवरे उपस्थित होते.

प्रास्ताविक अनुभव शिक्षा केंद्र विभागीय प्रमुख दीपक देवरे यांनी अनुभव शिक्षा केंद्राची माहिती व ओळख व एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा व भूमिका मांडली यानंतर कुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये युवकांनी आपल्या ध्येयाला समोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे जे की एखाद्या गोष्टीमध्ये अडकून न राहता संविधानिक मूल्याला घेऊन आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थींचा प्रयत्न असला पाहिजे असे आपल्या मनोगत मार्गदर्शन करताना बोलले. यानंतर सरस्वती शिंदे यांनी विद्यार्थी म्हणून स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा आत्मविश्वास म्हणजे काय आपल्या जे कमकुवत बाजू आहेत व तसेच आपल्या ज्या मजबूत बाजू घेऊन आपण आपल्या मध्ये विश्वास कसा निर्माण करायचा व आपल्या ज्या कमकुवत बाजू आहेत त्याच्यावर मात करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला त्या विषयाचे ज्ञान व संवाद महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण आपल्या विकनेस वरती आत्मविश्वास पणे विजय मिळवू शकतो यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शैक्षणिक धोरणाकडे वाटचाल असली पाहिजे यामुळे आपल्याला भविष्यात एक चांगल्या प्लॅटफॉर्म वरती उभारू शकतो व तसेच संविधानिक मूल्याला घेऊन आपण आपल्या परिसरामध्ये त्याची जागरूकता व ते मूल्य आपण आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे अवलंब करतो या संदर्भात सखोल असं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य रामलिंग मुळे यांनी मांडले यात आजपर्यंत महाविद्यालयीन काळात शैक्षणिक गुणवत्ता व तसेच क्रीडा व सामाजिक उपक्रम याबद्दल सखोल माहिती दिली या कार्यक्रमासाठी गावातील पालक व तसेच महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा संघटक विक्रम गायकवाड, जिल्हा सचिव ,जय सह्याद्री जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर मिरचे, व ,जिल्हा प्रचारक प्रसाद चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सी महाजन यांनी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनुभव शिक्षा केंद्राचे समन्वयक महादेव कोटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments