चुलीत गेले नेते; मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक
शिरोळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश नाही
शिरोळ:{सलीम पठाण} मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आंतरवली सराटी येथे आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील लढत असताना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना पाठिंबा देत असताना शिरोळ ता. निलंगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यत "चुलीत गेले नेते,चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण.. हेच आमचे लक्ष" या मथळ्याखाली गावात कुठल्याही पक्षाच्या नेत्याला गावात पाय ठेऊ देणार नाही असे बॅनर्स शिरोळ येथील प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत.
मराठा समाज आरक्षणासाठी आता शिरोळ येथील सकल मराठा समाज नेत्यांना गावात पाय ठेऊ देणार नाही हे मात्र निश्चित. गावातील इतर समाजातील लोकांनी पण या निर्णयाला पाठिंबा दिला आहे समजते.
0 Comments