Latest News

6/recent/ticker-posts

इस्राईलच्या विरोधात लातुरात मुस्लिम समाज रस्त्यावर;महात्मा गांधी चौकात विराट धरणे आंदोलन

इस्राईलच्या विरोधात लातुरात मुस्लिम समाज रस्त्यावर;महात्मा गांधी चौकात विराट धरणे आंदोलन


लातूर: फिलिस्तीनी मुस्लिमांवर इस्राईल अन्याय आणि अत्याचार करीत असल्याच्या निषेधात शुक्रवारी रोजी लातूर शहरासह जिल्ह्यतील विविध पक्ष, संघटनातील व समाजातील मुस्लिम बांधव एकवटले आणि त्यांनी गांधी चौक येथे रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले. फिलिस्तान येथे इस्रायलकडून नरसंहार केला जात आहे. हे कृत्य रोखण्यासाठी जी ट्वेंटीचे अध्यक्ष असलेल्या भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच मुस्लिम संघटना, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार आज गांधी चौक लातूर येथील धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

दि.27 ऑक्टोंबर 2023 शुक्रवार रोजी दुपारी 2:00 वाजता लातुरात गांधी चौक येथे इस्त्राईल निषेधार्थ  सर्व पक्षीय व सामाजीक संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आंतरराष्ट्रीय स्थरावर इस्त्राईल हा देश हुकुमशाही पध्दतीने फिलिस्तीनवर रासायनिक हल्ले करुन संयुक्त राष्ट्राचे उल्लंघन करत आहे ज्या मध्ये रुग्णालयावर हल्ला करुन निष्पाप नागरिकांना मारले जात आहेत ज्यात लहान बालके व महिला यांचा सहभाग आहे तसेच गाजा पट्टी यात हवाई हल्ले करुन 6700 लोक मुत्यूमूखी पडले आहेत तर 10 लाख लोक बेघर झालेले आहेत. हुकुमशाह पंतप्रधान इस्त्राईल बेंजामिन नेतन्याहूचा निषेध मुस्लिम बांधवांनी निषेध केला. संयुक्त राष्ट्राने हुकुमशाह पंतप्रधान इस्त्राईल बेंजामिन नेतन्याहू आंतरराष्ट्रीय खटला चालवावा व फिलिस्तीन यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments