Latest News

6/recent/ticker-posts

औसां शहरात धम्म रॅली काढून धम्म चक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

औसां शहरात धम्म रॅली काढून धम्म चक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा


बी डी उबाळे

औसा: भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका व शहर शाखाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीचे आयोजन करून धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका व शहर शाखा यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले.तत्पुर्वी सकाळी ठीक ९:३०वा समतानगर औसा येथील बौद्ध उपासक उपासिका व महिला शाखेकडून बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर समता नगर येथील सर्व उपासक भीमनगर येथे मुख्य ध्वजारोहण आदरणीय उद्धवजी लोंढे सर माजी.तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका यांच्या हस्ते करून शहरातील प्रमुख मार्गावरून धम्मरॅली काढण्यात आली.समतानगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारांत खीरदान करण्यात येवुन रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीच्या आयोजनासाठी ॲड.धम्मदिप डांगे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा औसा, सरचिटणीस दिलीप बौद्धवीर, कोषाध्यक्ष मारुती कांबळे येळीकर, सुरेशभाऊ सुर्यवंशी, किर्तीताई कांबळे महिला उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा औसा, आशाताईं कांबळे शाखा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी समतानगर यांनी परिश्रम घेतले.

तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेताजी बनसोडे शहराध्यक्ष औसा,शरद बनसोडे संरक्षण सचिव औसा, संतोष माने सर संस्कार उपाध्यक्ष औसा, विष्णू गवळी, यशवंत बनसोडे संरक्षण सचिव, किरण कांबळे, गितेश कांबळे, सुमेध कांबळे शाखा अध्यक्ष भीमनगर, प्रसाद डांगे, जयेश कांबळे, गणेश बनसोडे, धनराज बनसोडे, यांनी परिश्रम घेतले. रॅलीमध्ये मा.नगराध्यक्षा निताताई सुर्यवंशी, राजेंद्र आबा बनसोडे, मिलिंद सुरवसे, साधना सुरवसे, ज्योती डांगे, कमलबाई डांगे,सुरेखा बनसोडे,कैलास सोनकांबळे, अण्णाराव सुरवसे, मुकुंद कांबळे, संघर्ष बनसोडे, संकेत कांबळे,व भीमनगर, समतानगर औसा येथील बौद्ध उपासक, उपासिका, बाल, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments