जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेश महासचिव पदावर बालाजी जाधव, उजेडकर यांची दुसऱ्यांदा निवड
लातूर: मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संभाजीनगर येथे संपन्न झाली. बैठकीसाठी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि.विजयजी घोगरे, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, प्रा.अर्जूनराव तनपुरे यांच्यासह मान्यवर सदस्य उपस्थित होते. सदरील बैठकीत जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, जिजाऊ ब्रिगेड, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद अशा विविध कक्षांच्या नुतन प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी घोषित करण्यात आल्या.
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेश महासचिव पदावर बालाजी जाधव, उजेडकर यांची दुसऱ्यांदा निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश महासचिव पदावरुन त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल धनंजय उजनकर, ब्रिजलाल कदम, प्रकाश लेणेकर, ज्ञानदेव बरमदे, डा.शेषराव शिंदे, प्रा.हंसराज भोसले, कवी योगीराज माने, आबासाहेब पाटील, भास्करराव शिंदे, डा. तात्यासाहेब देशमुख, प्रमोद कदम यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
0 Comments