Latest News

6/recent/ticker-posts

आज आंबेगाव येथे ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे कीर्तन

आज आंबेगाव येथे ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे कीर्तन


मुख्याध्यापक बालाजी नरसिंगराव मेहत्रे यांचे सेवापुर्ती चे निमित्त

देवणी: सुप्रसिद्ध कीर्तनकार युवकवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांचे सुश्राव्य कीर्तन बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी देवणी  तालुक्यातील आंबेगाव येथे रात्री 8:00 ते 10:00 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. इंद्राळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नरसिंगराव मेहत्रे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ व वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन मेहत्रे परिवाराकडून करण्यात आले आहे.

बालाजी नरसिंगराव मेहत्रे यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून तीन दशकांपेक्षा जास्त काम केले. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची आजही ओळख आहे. अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम त्यांच्या हातून घडले. अखंडितपणे ज्ञानदानाचे काम करणारे मेहत्रे सेवानिवृत्त होत आहेत.

या निमित्ताने तालुक्यातील आंबेगाव येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने बुधवारी युवकवीर ह. भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गटविकास अधिकारी सोपानराव अकेले, गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर, विस्तार अधिकारी एस. यु. रोडगे, केंद्रप्रमुख सदाशिव साबणे, केंद्रीय मुख्याध्यापक भरत निलेवाड उपस्थित राहणार आहेत. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे गेली 17 वर्षे महाराष्ट्र , कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश जिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. आत्तापर्यंत ५००० पेक्षा जास्त कीर्तनरूपी सेवा त्यांनी दिली आहे. झी टॅाकीज या वाहिनीवर तब्बल १५ वेळेस कीर्तन सेवा प्रसारित करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार अरुणकुमार, अमोलकुमार आणि अमितकुमार बालाजी मेहत्रे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments