जुगलकिशोर तोष्णीवाल यांना मानद पी एच डी प्रदान
लातूर: येथील जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष जुगलकिशोर तोष्णीवाल यांना इंदोर येथे संपन्न झालेल्या वेदांग महोत्सवात समाजसेवेसाठी मानद पीएचडी प्रदान करून गौरविण्यात आले.
मां भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थान आणि मां भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ आणि ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे वेदांग ज्योतिष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जागतिक कीर्तीच्या ज्योतिष वास्तू, हस्त रेखा, यंत्र-तंत्र-मंत्र आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. लातूरच्या जुगलकिशोर तोष्णीवाल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत
मां भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी देऊन या महोत्सवात गौरविण्यात आले. मां भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आचार्य पंडित संतोष भार्गव आणि मां भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ दीप्ती भदोरिया यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी देश विदेशातील जवळपास २५० ज्योतिष विद्वान, साधक, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय तसेच मध्यप्रदेश सरकार मधील अनेक मंत्री उपस्थित होते.
मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल जुगलकिशोर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जुगलकिशोर हे "माझं लातूर" परिवाराचे क्रियाशील सदस्य असून प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. माझं लातूर परिवाराच्या वतीनेही अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments