लातूरच्या कन्या ठरल्या राज्यातील सर्वोकृष्ट धनुर्धर
राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धा : रिकर्व्ह धनुर्धर वैष्णवी, जान्हवी, श्रावणी ने पटकाविले सुवर्ण पदक
लातूर : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली बीड जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने परळी वैजिनाथ (बीड) येथे झालेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा असोसिएशन चे धनुर्धर वैष्णवी पवार, जान्हवी पवार, श्रावणी पोलेकर यांनी रिकर्व्ह धनुष्य प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले असून त्या सर्व राज्यातील सर्वोत्कृष्ठ रिकर्व्ह धनुर्धर ठरल्या आहेत.
लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत धनुर्धर वैष्णवी पवार, जान्हवी पवार, श्रावणी पोलेकर यांनी रिकर्व्ह धनुष्य प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकाविले आहे. सदरील धनुर्धर आर्चरी कोच सुधीर पाटील व सुषमा पवार यांच्या कडे उदगीर येथे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात धनुर्विध्येचे प्रशिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय आर्चरी कोच रणजीत चामले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान लातूर जिल्हा धनुर्विद्या क्रीडा असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे व सचिव तथा राज्य तांत्रिक समिती अध्यक्ष अशोक जंगमे यांच्या हस्ते धनुर्धर वैष्णवी, जान्हवी, श्रावणी यांना गौरविण्यात आले. विजयी धनुर्धरांचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष शिवाजी आळणे, सहसचिव राजेश देवकर, कार्यकारिणी सदस्य महेश पाळणे, सूर्यकांत साळुंके, प्रवीण गडदे, सागर मोहिते,अनिल कमळापुरे, नवनाथ गरगटे, हनुमंत केसरे, भास्कर तामटे, नितीन डांगरे, ज्ञानेश्वर खोत आदींसह जिल्ह्यातील खेळाडू पालक आणि क्रीडा प्रेमींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments