Latest News

6/recent/ticker-posts

कवयित्री सौ. माया सोनवणे-दिवाण यांच्या 'उजेडाचे गीत' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवयित्री सौ. माया सोनवणे-दिवाण यांच्या 'उजेडाचे गीत' काव्यसंग्रहाचे प्रकाशन


 बीड: कोहिनूर लॉन्स येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ द्वारा संचलित राजर्षी शाहू कन्या प्राथमिक विद्यालय, बीड या शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका कवयित्री सौ. माया शिवाजी सोनवणे-दिवाण यांच्या 'उजेडाचे गीत' या तृतीय काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी व संगीतकार मा. प्रा. प्रशांत मोरे(मुंबई) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव जाहेर पाटील उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव प्रा. जे पी शेळके म्हणाले की, समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करण्यासाठी 'उजेडाचे  गीत' हा काव्यसंग्रह उपयोगी पडेल. कवितेच्या माध्यमातून मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त झाला आहे असे  गौरवोद्गार काढले.

या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी 'उजेडाचे गीत' या काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या. आणि 'तिच्यामध्ये दिसते मले तव्हा माझी माय', 'फुफाटा', 'बाप नारळी खोबरं आई नारळाचे पाणी' व इतर कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आणि सौ. माया सोनवणे- दिवाण यांच्या कविता वामनदादा कर्डक यांच्या परंपरेतील शोषितांच्या व्यथा मांडणाऱ्या आहेत असे गौरवदगार त्यांनी काढले. बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक व साहित्यिक प्रा. कमलाकर कांबळे यांनी काव्यसंग्रहातील कवितेचे वैविध्य सांगत हा काव्यसंग्रह  सर्वसामान्य माणसांच्या अंधारलेल्या जीवन वाटेवरचे हे प्रकाश दाखवणारे उजेडाचे गीत ठरेल या शब्दात कौतुक केले.

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.बलभीमराव जाहेर पाटील आणि संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य ए.आर.पाटील यांनी उजेडाचे  गीत या काव्यसंग्रहास आणि कवयित्री सौ माया सोनवणे-दिवाण यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कवयित्री मनोगत व्यक्त करताना सौ.माया सोनवणे-दिवाण यांनी प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दिले व काव्यसंग्रह प्रकाशित करण्यामागची प्रेरणा व भूमिका सांगितली. काही निवडक रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष  डॉ.बी.आर. पंडित, सहसचिव प्रा. विठ्ठलराव जोगदंड, संचालक प्रा. शिवाजीराव जगताप, वशिष्ठ खांडे, श्रीम. मथुराबाई जाधव, प्राचार्य ए.आर.डंबरे यांच्यासह शाहू कन्या विद्यालय व शाहू आय.टी.आय मधील सर्व शिक्षक, निदेशक विद्यार्थिनी व बहुसंख्य पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  स.सी. जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.डी. कदम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments