मराठा आरक्षण प्रश्नी नळेगाव बंद
नळेगाव: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी गावात मराठा आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात नळेगाव कडकडीत बंद पाळून तलाठी प्रशांत तेरकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. जालना येथील अंतरवली सराठी या लाठीमारात मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी ३५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. या पार्श्वभूमीवर नळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यामुळे राज्य सरकारने जबाबदारी घेऊन चालते व्हावे अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजात भांडणे लावणे, केस दाखल करणे असे षडयंत्र सरकारने रचलेले आहे. असा आरोप सकल मराठा समाज नळेगाव यांनी केला. तसेच संवैधनिक पद्धतीने आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे तसेच मराठा समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू अशी मागणी सकल मराठा समाज नळेगाव यांच्या तर्फे करण्यात आली.
यावेळी सरपंच सूर्यकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, माजी चेअरमन दयानंद मानखेडे, ग्राम पंचायत सदस्य उमाकांत सावंत, गणेश सिंदाळकर, सत्यवान सावंत, शंकर शेलार, राजू शेलार, सुरेंद्र सावंत, गणेश सूर्यवंशी, राजू सावंत, माधव सावंत, बालाजी सावंत, बालाजी शेलार, शिवाजी डोरले, सत्यवान फरकांडे, बालाजी सावंत, चंद्रकांत डोरले, सुनील भोसले, संतोष तेलंगे, सुनील चव्हाण, अमोल सोमवंशी, शुभम फरकांडे, जयराम लांडगे, संतोष बरचे, जनक डोरले, कैलास चव्हाण, समाधान बोडके, बद्रीनाथ सोनटक्के, महेश सावंत,श्याम सावंत, रामेश्वर मुदगडे, ओम शेलार, अक्षय शेलार, संदेश शेलार, स्वप्नील शेलार, छोटू फरकांडे, मुन्ना शेलार, सुनील धविले, दत्ता शिंदाळकर, वैभव धामणगावकर, संजय कदम, अनिल जाधव, अनिल भोसले यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments