युनिव्हर्सल पब्लिक स्कूल शाळेमध्ये आजी-आजोबा दिन
औराद शहाजनी: दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी युनिव्हर्सल पब्लिक स्कूल शाळेमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव भंडारे तंटा मुक्ती अध्यक्ष व अतिथी शिवाजीराव अंचोळे प्रगत शेतकरी, प्रा.भगवानराव पेठकर उपस्थित होते.
स्वागत गीत श्रद्धा मगनुरे, रणवीर बिरादार, जाधव आयुषी, भंडारे पूजा, पौल पार्थ या मुलांनी दादा दादी कम तू द स्कुल यानी सादर केले व त्या नंतर वागदोरे भक्ती, पाटील प्रणाली, शेख सफा, थेटे दिशा, जमादार प्रीती, काणेकर आराध्या, सगरे वैभवी, सौदागर रेणुका, पहेलवान यश, आयान मुला, शेळके समर्थ, कोडे समर्थ, शिंदे ज्ञानेश्वर, पवार प्रीतम, गायकवाड समर्थ, चौधरी कृष्णा, सूर्यवंशी कृष्णा, हाडोळे आदित्य, पाटील रुद्र तुझमे रब दिखता है व एलकेजी व युकेजी च्या पिचारे अर्चना, मुळे वेदिका, आमले अनुष्का, उगले प्रियांश, उगले तेजस, फुलारी समर्थ, जोशी श्रीनिधी, काळे अपूर्वा, श्री डीघे, बिरादार प्रथमेश, कांबळे प्रगती, काबरा गोदा, बडूरे आलीना, सूर्यवंशी प्रिन्स, सूर्यवंशी अमृता, पाटील श्रीधर यानी दादाजी की छडी हू मैं या गाण्यावर नृत्य सादर केले. नंतर आजी आजोबा याचे त्याच्या नातवंडं कडून चरण धुऊन, ओवाळणी करून व स्वतःच्या हाताने बनवलेले भेटवस्तू त्यांना दिले.
त्यानंतर काही मुलांनी आजी आजोबा चे महत्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कसे असते याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन पाटील सरिता, मुल्ला अमर, स्वामी अंजली, मुल्ला रिहान यांनी केली. आभार प्रदर्शन श्रुती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments