Latest News

6/recent/ticker-posts

पवन ऊर्जा प्रकल्पाचा आमदार अभिमन्यू पवार व ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते कासार शिरशीत शुभारंभ

पवन ऊर्जा प्रकल्पाचा आमदार अभिमन्यू पवार व ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते कासार शिरशीत शुभारंभ

कासार सिरसी:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदार) व्ही इ एच इंन्सु एबल्स एनर्जी प्रावेट लिमिटेड या 125 मेगावॅट पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ औशाचे आमदार अभिमन्यू पवार व उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जागतिक अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सिफो टेक्नॉलॉजी लिमिटेड चे राजू वेगेसांन व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास विश्वनाथ मुख्य वित्तीय अधिकारी एम पी विजयकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय कुमार पब्बा यांचे सह 68 गावातील प्रमुख मान्यवरासह मोठा जनसमुदाय जमला होता.

9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कासार सिरसी शहराच्या सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ रोवत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरसीत १२५ मेगावॅट निर्मितीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करत शहराच्या विकासात आणखीन एका विकास पर्वाचा शुभारंभ केला.

शासनाच्या अक्षय ऊर्जा योजनेअंतर्गत या पवन ऊर्जेच्या माध्यमातून कायम कमी दरात शेतकऱ्यांना वीज मिळणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनी या प्रकल्पास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले तर 125 मेगावॅट या प्रकल्पातून सध्या 54 मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments