Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हिसामाबाद उजेड येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हिसामाबाद उजेड येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात


शिरूर अनंतपाळ: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हिसामाबाद उजेड येथे आज भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी उभयतांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बालाजी जाधव आणि बालाजी शिंदे यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी या महामानवांच्या जीवनप्रसंगाविषयीची भाषणे केली. दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्रासंबंधीची महत्वपूर्ण माहिती सांगणारे मनोगत मुख्याध्यापक बालाजी जाधव यांचे झाले.

थोरांची जीवनचरित्रे विद्यार्थ्यांनी वाचावीत आणि त्यातून प्रेरणा घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. शाळेतील जेष्ठ विद्यार्थीप्रिय शिक्षक बालाजी शिंदे यांचा वाढदिवस असल्याने सहकाऱ्यांनी यथोचित सन्मान करुन शुभेच्छा दिल्या. शिंदे गुरुजींनी वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पेनांचे आणि मिठाईचे वाटप केले. कार्यक्रमाचे संचलन देविदास कांबळे यांनी केले. यशस्वीतेसाठी संजयकुमार शिंदे, सचिन गुणाले, महादेव बनसोडे, जयश्री कुमदाळे, श्रीदेवी गरगटे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments