Latest News

6/recent/ticker-posts

प्रगत शिक्षण संस्थेच्या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका घेतायेत ‘निपुण भारत’ पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचे धडे

प्रगत शिक्षण संस्थेच्या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका घेतायेत ‘निपुण भारत’ पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचे धडे


बी डी उबाळे 

औसा: केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत’ अंतर्गत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातर्गत प्रगत शिक्षण संस्था फलटण ही लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती औसा च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत १८० अंगणवाड्यांसोबत व २५ जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या क्षेत्रात काम सुरु आहे. या अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक यांना प्रशिक्षणे देण्यात येतात. सर्व अंगणवाड्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे ECE kit, ग्रंथालयांची पुस्तके, लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी, प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहाय्यकांच्या नियमित अंगणवाड्यांना भेटी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अभ्यास दौरे, पालक सभा, गृहभेटी, विद्यार्थी मूल्यमापन, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण हे उपक्रम घेतले जातात. जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ ली व इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यांना. आपण वाचू या पुस्तिका, गणित तालीम १ व २ पुस्तिका सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येते. सोबत ग्रंथालय पुस्तके, शालेय स्टेशनरी देण्यात येते.

या प्रकल्पांतर्गत नुकतेच १८० अंगणवाडी सेविका व १८० मदतनीस यांचे प्रथम प्रशिक्षणनुकतेच घेण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पाअंतर्गत सर्व १८० अंगणवाड्यामध्ये ६ हजार ४८० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच औसा तालुक्यातील २५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ५७५ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

सदर प्रकल्प महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई(MPSP) व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) व जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) जावेद शेख यांच्या मान्यतेने निपुण भारत अंतर्गत राबविला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी औसाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किशोर लक्ष्मण गोरे यांचे विशेष मार्गदर्शन व सूचना देण्यात येत आहेत. औसा तालुक्यात अतिशय प्रभावीपणे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत दर तीन महिन्याने MPSP व MSCERT शैक्षणिक कामाचा आढावा घेन्यात येतो.प्रकल्प यशस्वी करण्यासाठी औसा तालुक्याचे एकात्मिक बाल विकास योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे, विस्तार अधिकारी विश्वास कुंभकर्ण, अनुपमा सुनापे, प्रगत शिक्षण संस्थेच्या विश्वस्त तथा उपाध्यक्ष भाषातज्ञ डॉ.मंजिरी निंबकर, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले,विशेष साधन व्यक्ती मुख्याध्यापिका समिरा कुरेशी, प्रकल्पाचे संपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे व प्रकल्प अधिकारी अमृता परहर, प्रकल्प सहाय्यक मुक्ता बनसोडे. आम्रपाली सोनवणे, महादेवी सूर्यवंशी, शितल इळेकर, अलका बिराजदार, मधुशिला सुर्यवंशी, रिपका कुवर, रेणुका खेडकर, तनुजा जाधव, सीता बडुरे, शिला निकाळजे, विजयमाला पाटील, रुपाली भापकर हे प्रयत्नशील आहेत.या प्रकल्पामुळे औसा तालुक्यातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल होत असून त् या प्रगत संस्थेच्या शिक्षणामुळे लहान बालकांमध्ये अमुलाग्र बदल होत असून याचा फायदा शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना या लहान बालकांना दैनंदिन बालमनावर योग्य संस्कार करण्यासाठी अत्यंत उपयोगी अशा टिप्स या प्रगत संस्थेकडून एक आदर्श भारत निर्माण करण्यासाठी मिळत असल्याची चर्चा सध्या औसा तालुक्यामध्ये सुरू आहे.

Post a Comment

0 Comments