निलंगा तालुक्यातील शिरोळ ग्रा.पं.तर्फे धुर फवारणी मोहिम
सलीमभाई पठाण
शिरोळ: सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांचं प्रमाण वाढलं आहे.त्यापासुन डेंग्यू, मलेरिया यासारखे जिवघेणे आजार होऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन आज निलंगा तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायतच्या वतीने धुर फवारणी मोहिम राबवण्यात आली. संपुर्ण गावात आणी घरोघरी जाऊन ग्रा.पं. चे कर्मचारी अमोल कजेवाड आणी सोमनाथ क्षीरसागर यांनी धुर फवारणी केली.
आरोग्याच्या बाबतीत ग्रामपंचायत शिरोळ ही सतर्क आहे हेच यातुन दिसते असे गावकरी म्हणत होते. असे अभिनव उपक्रम वेळोवेळी व्हावेत आणी वर्षातुन किमान दोनदा तरी धुर फवारणी करावी असे गावकरीऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी यावेळी सरपंच,उपसरपंच,सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांचे विशेष कौतुक करुन आभार मानले.
0 Comments