बुजरुग्वाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
निटूर: निलंगा तालुक्यातील बुजरुग्वाडी येथे साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विद्यालय निटूर येथील मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व समजविषयीची तळमळ याविषयी मत व्यक्त केले. यावेळी जयंत शिंदे, प्रकाश शिंदे, भगवान शिंदे, गोरख शिंदे, विठ्ठल शिंदे, मनोज शिंदे, तुकाराम, अंबाजी, बाबू खंडाजी कांबळे, गुंडू शिंदे, सरपंच, साहेब राव भोयबार, ग्रा पंचायत सदस्य श्री विठ्ठल मा. भोयबार, शिवाजी अ. जाधव, लक्ष्मी अनंत सूर्यवंशी, माजी सरपंच विकास पाटील सह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र विदयालय निटूर येथे टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
निटूर: येथील महाराष्ट्र विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments