जिल्ह्यातील खेळाडूंने मार्शल आर्ट स्पर्धामध्ये सुद्धा लातूर पॅटर्न निर्माण करावा- प्रा. डॉ. अनंत पवार
लातूर: जिल्ह्याच्या खेळाडूंने मार्शल आर्ट स्पर्धामध्ये सुद्धा लातूर पॅटर्न निर्माण करावा असे उदगार प्राचार्य डॉ. अनंत पवार यांनी लातूर येथे आयोजित सहावी लातूर जिल्हास्तरीय फुनाकोशी कराटे स्पर्धेच्या वेळी म्हणाले. लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत पवार हे होते तर वर्ल्ड इंग्लिश स्कूलचे प्राचार्या जयश्री बरमदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा इंदिरा गांधी सूतमिलचे उपसंचालक धनराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर स्पर्धेत जिल्ह्यातून २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकॅन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अजमीर बी.शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. रवीकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या रामेश्वर सगरे, चंद्रकांत सारगे, राजेश भालेराव, संदीप पवार, अजित ढोले, विशंद कांबळे, अतिक पटेल, कृष्ण कांबळे, साजीद शेख, रिहान शेख, मुजाहीद सय्यद आदिने पंच म्हणून काम पाहिले.
0 Comments