Latest News

6/recent/ticker-posts

क्रांतीवीर दत्तोबा भोसले म्हणजे धगधगता अंगार- बालाजी जाधव

क्रांतीवीर दत्तोबा भोसले म्हणजे धगधगता अंगार- बालाजी जाधव


शिरूर अनंतपाळ
: "मातोळ्यासारख्या छोट्याशा खेडेगावात सामान्य शेतकरी कुटूंबातील दत्तोबा भोसले यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात केलेली कामगीरी प्रेरणादायी असून त्यांच्या या लढ्यातील घटना रोमहर्षक आहेत. हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेताना प्रज्वलीत झालेली ही ज्योत बडोदा येथील शिक्षण घेताना मशाल बनली. मातृभूमी पारतंत्र्यात असताना खाजगी आयुष्य जगण्याचा मोह न होता ते या लढ्यात उतरले. स्वत:च्या संघटन कौशल्याने अनेक तरुणांना संघटीत केले. नेतृत्व दिले. क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पावलावर पाऊल टाकत तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांना गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन " मुक्तापूर स्वराज्य"स्थापन केले. त्यांच्या शौर्याला,अतुलनीय त्यागाला सीमा नव्हती. ही सगळी शौर्याची गाथा नव्या पिढीने समजून घ्यावी. "असे प्रतिपादन शिवश्री बालाजी जाधव यांनी जयभवानी विद्यालय हालकी येथे आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतीवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी यांच्यावतीने आयोजित विचारयात्रेत ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी जयभवानी विद्यालय हालकी येथील प्राचार्य पांडुरंग रेड्डी हे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मिरकले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments