लातूर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा उत्साहात
नळेगाव: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त रुरल अँड अर्बन किकबॉक्सिंग असोसिएशन, लातूर द्वारा... या स्पर्धेचे आयोजन अनिलभैय्या चव्हाण मित्र मंडळ, नळेगाव यांनी केले होते. लातूर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा 2023 ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून व एक मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी चाकुर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, सरपंच सूर्यकांत{काका चव्हाण, उपसरपंच पदमिनबाई खांडेकर, वि.का.से.स. सोसायटीचे चेअरमन शेषेरावजी मुंजाने, माजी पंचायत समिती सदस्य अनिलभैया चव्हाण,माजी चेअरमन दयानंद मानखेडे, माजी उपसरपंच पांडुरंग{दादा} रेड्डी, ग्रामपंचायत सदस्य चांद मजकुरी, अश्फाक मुजावर, मुस्लिम कमिटीचे युनूस मुजावर, गुंडेराव मोरकांडे, युसुफ शेख,राजू शेलार, गणेश शिंदाळकर, सत्यवान सावंत, जिजाऊ इंग्लिश स्कूलचे बळीराम जाधव, किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष खय्युम तांबोळी, सचिव के वाय पटवेकर, स्पर्धा संयोजक संतोष तेलंगे सह मान्यवर मंचावर उपस्थित होते.
विलासराव पाटील चाकूरकर, अनिलभैया चव्हाण, शमीम कोतवाल यांनी खेळाडूंना जिल्हास्तरीसह, राज्यस्तरीय स्पर्धेत निवड होणाऱ्या स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला जिल्हाभरातून 100 पेक्षा अधिक खेळाडूने भाग घेतला.
या स्पर्धेला पंच म्हणून विक्रम गायकवाड, संतोष तेलंगे, अझहर शेख, अविनाश राठोड, कालिदास गायकवाड, गणेश तेलंगे, रीलस्टार बबलू सय्यद यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सदर किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव के वाय पटवेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रल्हाद माचवे यांनी केले. आभार प्रदर्शन स्पर्धा संयोजक संतोष तेलंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास(भैय्या) चव्हाण, बाळासाहेब बरचे, आदित्य तेलंगे, व्यंकट माचवे, हक्काने शेख, अनिल पांचाळ, ऋषिकेश पाटील, गणेश धविले, तोफिक घोरवाडे, भद्रेश्वर सोनटक्के आदीने परिश्रम घेतले.
0 Comments