Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात


निटूर: येथील महाराष्ट्र विद्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा वेळी उपस्थितीयासमोर विद्यार्थ्याने देशभक्ती गीते व भाषणाने केली.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेरमन दिनकर(नाना) निटुरे, लातूर रत्न वृत्तपत्राचे संपादक रविकिरण पिंड, "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे संपादक के वाय पटवेकर, पत्रकार राजकुमार सोनी, पत्रकार रमेश शिंदे, पत्रकार माधव शिंदे, पालक लक्ष्मण मगर, खंडेराव घाटके, भागवत बाबर, देविदास निटुरे, प्रशांत सूर्यवंशी, काशिनाथ जाधव, जगन्नाथ बसवणे, पापालाल शेख, बालाजी भालके, मोहन निटुरे, राजू देव जोशी, बुजरुग्वाडीचे उपसरपंच ज्ञानोबा पौळकर, विलास ढगे, गोविद पौळकर, व्यंकटराव कोपले, धनाजी घोडके, संजय पाटील, माजी विद्यार्थी पत्रकार नामदेव तेलंगे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मार्च 2023 मध्ये केंद्रातून व शाळेतून 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यालयातून शिक्षण घेऊन विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व विद्याथ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी विनोद निटुरे यांच्याकडून कै. शेषेरावविश्व्नाथ निटुरे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले, त्याचबरोबर माजी विद्यार्थी, युसुफ शेख व प्रशांत अंगद निटुरे यांचे कडून द्वितीय विद्यार्थी शाबाज शेख, यांना तर माजी विद्यार्थिनी शेंद रंजना शिंदे कडून तृतीय विद्यार्थिनी बाबर प्रतीक्षा 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.

शुभांगी पौळकर याविद्यार्थिनींना होतकरू विद्यार्थी, म्हणून कै. नरशिंग राजाराम भोयबार यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचा पुरस्कार भोयबार यांचा कडून देण्यात आला. तसेच विद्यालयातून प्रथम आल्याबद्दल प्रेरणा सूर्यवंशी, व प्रगती प्रशांत सूर्यवंशी याविद्यार्थिनीचा ॲड. हांडे कलांडीकर व घोरपडे यांचे कडून प्रत्येकी 500 रुपयाचा पुरस्कार देण्यात आला. येथून पुढे मार्शल आर्ट खेळ प्रकारामध्ये शालीस्तरावर प्रथम येणाऱ्या प्रथम खेळाडूस पत्रकार के वाय पटवेकर यांच्यातर्फे 1001 हजार रुपयांचे पारितोषक घोषित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments