नळेगाव येथे लातूर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा
नळेगाव: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त रुरल अँड अर्बन किकबॉक्सिंग असोसिएशन, लातूर द्वारा आयोजित लातूर जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा 2023 ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, नळेगाव ता. चाकूर येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन अनिलभैय्या चव्हाण मित्र मंडळ, नळेगाव यांनी केले असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या 35 व्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड होणार आहे. अधिक माहितीकरिता रुरल अँड अर्बन किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष के ए तांबोळी, सचिव के वाय पटवेकर, स्पर्धा संयोजक तथा असोसिएशनचे पदाधिकारी संतोष तेलंगे, विक्रम गायकवाड, अर्चना राठोड 9921777284,9270888587,9764074746,9764662374 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0 Comments