भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोपानिमित्त कै.नरसिंहराव चव्हाण विद्यालय, नळेगाव येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहात
नळेगाव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी समारोपानिमित्त कै.नरसिंहराव चव्हाण विद्यालय, नळेगाव येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सदर शाळेच्या सचिव सौ. सविताताई चव्हाण, उपाध्यक्ष संभाजीराव भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण, अशिहरा कराटे असोसिएशन लातूरचे सचिव संतोष तेलंगे, "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे संपादक के वाय पटवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष संभाजीराव भालेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन झाले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एन वाघमारे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांनी मानले. यावेळी सी व्ही चव्हाण, ए ए तोंडारे, बी व्ही मेहत्रे, डी एम कदम, जी आर माचवे, एस एम भादाडे, एच यु गुनाले, ए व्ही मेहेकरे सौ. ए एस फरकांडे, आर व्ही सोनटक्के, एस व्ही जोगदंड, एस पी हुडगे, सौ. एम पी पांचाळ सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
0 Comments