Latest News

6/recent/ticker-posts

प्रा. डॅा. सुनीता सांगोले यांची मराठी विभाग प्रमुख पदी नियुक्ती !

प्रा. डॅा. सुनीता सांगोले यांची मराठी विभाग प्रमुख पदी नियुक्ती ! 

लातूर: दयानंद कला महाविद्यालय मराठी विभागप्रमुख डॉ.शिवाजी जवळगेकर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले आहेत.

महाविद्यालय विकास समिती बैठकीत झालेल्या ठरावानुसार मराठी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. डॉ.सुनिता सांगोले यांची १ ऑगस्ट 2023 पासून दयानंद कला महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून प्रा. डॉ. सुनिता सांगोले या दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे मराठी पदव्युत्तर संशोधन विभागात कार्यरत आहेत. त्या मराठी साहित्य व भाषा विज्ञानाच्या अभ्यासक म्हणून सुपरिचीत आहेत. आजवर त्यांचे 35 शोधलेख विविध नियतकालीकांतून प्रकाशीत झाले असून त्यांच्या नावावर 10 पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांनी पीएच.डी संशोधन पदवी पूर्ण केली असून, तीन विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरु आहेत. दयानंद शिक्षण संस्थेच्या आनुदानातून एक लघूशोध प्रकल्पाचे त्यांचे कार्य सुरु आहे. एक मनमिळावू, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि उत्तम वक्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सध्या त्या कार्यरत आहेत. प्रा. डॉ. सुनिता सांगोले यांना नेमणूक पत्र देऊन पदग्रहण समयी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, डॅा. सुभाष कदम व महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments