Latest News

6/recent/ticker-posts

ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी श्री शांतिनिकेतन शाळेच्या 35 विद्यार्थ्यांची निवड

ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी श्री शांतिनिकेतन शाळेच्या 35 विद्यार्थ्यांची निवड

लातूर: लातूर शहरातील अंबाजोगाई रोड भागात असलेल्या श्री शांतिनिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यातील सर्वच 35 विद्यार्थ्यांची ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका मोलगी यानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

औरंगाबाद येथे नुकत्याच थायबॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेसाठी लातूर शहरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता श्री शांतिनिकेतन शाळेच्या 35 विद्यार्थी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत श्री शांतिनिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी  विविध पदके पटकावले असून यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक.12 विद्यार्थ्यांनी रोप्य पदक व 11 विद्यार्थ्यांनी कांस्यपदक जिंकले आहे.या यामध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्यामध्ये अंजलान सिद्दिकी, इद्रीस सय्यद, राजवीर नागराळे,आबासाहेब हंगरगे,कृष्णा तिडके, उमर शेख,  दिग्विजय पाटील,तंनाज सिद्दिकी,प्रज्ञा खाडे,जानवी गोलकुंडे,संजना एच यु, मुंतशीर खान, यांनी सुवर्णपदक मिळवले आहेत. तर रोप्य पदक व कास्यपदक मिळवणाऱ्या अशा एकूण एकूण 35 विद्यार्थ्यांची ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवून भुवनेश्वर ओडिसा येथे राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे श्री शांतिनिकतन शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका मोलगी, जनादन रेड्डी व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे सोहेल शेख, सरफराज शेख फरहान नभी आदिनी यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments