Latest News

6/recent/ticker-posts

शालेय जीवनातच आत्मसंरक्षणाचे मुलींनी धडे घ्यावे- उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत कदम{IPS}

शालेय जीवनातच आत्मसंरक्षणाचे मुलींनी धडे घ्यावे- उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत कदम{IPS}


चाकूर: अशिहरा कराटे असोसिएशन लातूर द्वारा सेल्फ डिफेन्स मल्टीपर्पज अकॅडमी,चाकूर च्या वतीने दहा दिवसाचे स्थानिक मुलीं करिता स्वसंरक्षण{ Self Defense } प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलीना प्रमाणात वाटपाचा कार्यक्रम चाकूर नगरपंचायत सांस्कृतिक सभागृह येथे नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम{IPS} यांची होती.

स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुलींना सद्यस्थितीला अत्यंत आवश्यकता असून जर कोणी अचानक स्वतःवर हल्ला केल्यास प्रतिकार सेल्फ डिफेन्स करण्यासाठी स्वसंरक्षण मार्शल आर्ट प्रशिक्षण शालेय जीवनातच आत्मसंरक्षणाचे मुलींनी धडे घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम{IPS} यांनी मांडले.

यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी उपस्थित मान्यवरांच्या समक्ष प्रात्यक्षिक करुन दाखवले व उपस्थितीयांचे मने जिंकले.


 यावेळी मंचावर पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, चाकूर तालुका काँग्रेस अध्यक्ष- विलासराव पाटील, चाकूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष- अरविंद बिराजदार, माजी सरपंच- गंगाधर केराळे, चाकूर शहर अध्यक्ष काँग्रेस- पप्पूभाई शेख, प्रतिष्ठित व्यापारी- पांडुरंग पोलावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सलीम तांबोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन कराटे प्रशिक्षक युसुफ शेख यांनी मानले.



Post a Comment

0 Comments