माजी विध्यार्थ्यांकडून सहशिक्षक पाटील यांचा सेवा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात
निलंगा :(विशेष प्रतिनिधी /इरफान शेख) तालुक्यातील मौजे धानोरा येथील कै.राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा येथील सहशिक्षक दिपक शेषेराव पाटील हे नियत वयोमानानुसार 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त माजी विध्यार्थ्यांकडून कृतज्ञता सोहळा दि. 22 जुलै 2023 रोजी धानोरा येथील श्री काळभैरवनाथ मंदिर (सभागृह) येथे आयोजन करण्यात आले होते.
सहशिक्षक दिपक शेषेराव पाटील यांचे मूळ गाव पोमादेवी जवळगा ता.औसा जिल्हा लातूर येथील आहेत. पाटील कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा येते 1993 साली रुजू झाले त्यानंतर आजतागायत त्यांनी आपलं पूर्ण वेळ विध्यार्थ्याना घडविण्यासाठी खर्च केले आहे.
आज सेवा कृतज्ञता सोहळ्याच्या व्यासपीठावरून माजी विध्यार्थी बोलत असताना शाळेतील अनेक आठवणींना उजाळा दिले व पाटील यांच्या बद्दल आदर व्यक्त केले. शाळेतील सर्व शिक्षक व पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक विध्यार्थी डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनीरिअर सह अनेक क्षेत्रात विध्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविले आहे.
तसेच जि.प.शाळा धानोरा व माजी विध्यार्थ्यांकडून पाटील सहपत्नी सत्कार करण्यात आला तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी कर्मचारी यांचा सुद्धा सहपत्नी सत्कार करण्यात आला. पाटील यांच्या सह मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक, कर्मचारी, विध्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विध्यार्थी सह ग्रामस्थ उपस्थितीत होते.
0 Comments