रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातील १३८ ऑटोरिक्षा चालकांना गणवेश वाटप
लातूर: शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग आणि माझं लातूर परिवाराच्या वतीने शहरातील १३८ गरजु ऑटो चालकांना गणवेश वाटप आणि रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी मोटार वाहन निरीक्षक शांताराम साठे होते. याप्रसंगी वाहन निरिक्षक विशाल यादव, मनोज लोणारी, माझं लातूर परिवाराचे शामसुंदर मानधना, जुगलकिशोर तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लातूर परिवहन विभागाच्या वतीने अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचा आदर करून त्याचे पालन करावे असे आवाहन शितल गोसावी यांनी केले. ऑटो किंवा इतर कुठलेही वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, सिग्णलचा अनादर, अधिकचे प्रवासी ही बाब गंभीर असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशारा वाहन निरीक्षक शांताराम साठे यांनी अध्यक्षीय भाषणात दिला.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह माझं लातूर परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments