मौलाना आझाद करिअर मार्गदर्शन शिबिर तथा संस्थेतील उचशिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांच्या सत्कार
अहमदपूर: येथील मौलाना आझाद एज्युकेशनल सोसायटी, नुर-अल-हुदा उदगीर, जनकल्याण ग्रामविकास सेवा संस्था,अहमदपूर यांच्या वतीने मौलाना आझाद इनस्पायरेशन अवॉर्ड तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब उपस्थित होते.
प्रसंगी अत्यंत स्तुत्य व चांगला उपक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असते. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुजिबजी पटेल जहागीरदार, सल्लागार डॉ काझीम मलिक सरत्कर मूर्ती अरबाज खान पठाण बाळासाहेब पाटील चिकटणेकर, शिवानंद तात्या हिंगणे मौलाना लतिफसाब, मोहसीन भाईजित, इमरोज पटवेकर, अय्याजभाई शेख, ॲड. सादिक शेख, सय्यद नजीब जागीरदार, रज्जाक बापू देशमुख, शुकुर जहागीरदार, सय्यद नसीब जागीरदार, डॉ. फुजैल जहागीरदार, नावेदभाई काझी, युसुफभाई सय्यद, मोईब कादरी, शेख वाजीदभाई, शेख दस्तगीर, भैय्याभाई सय्यद, संयोजक फारुख जहागीरदार, बाबूभाई रुईकर, मेहबूब गुतेदार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन रियाज निचलकर व काझी रियाज यांनी तर आभार फारुख काझी यांनी मानले.
0 Comments