Latest News

6/recent/ticker-posts

मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु; उदगीर,देवणी येथील वसतिगृहात मिळणार प्रवेश

मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु; उदगीर,देवणी येथील वसतिगृहात मिळणार प्रवेश


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन


लातूर:(जिमाका) दि. 18 - जिल्ह्यातील देवणी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उदगीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आणि उदगीर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथील सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी http://www.hostel.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागासवर्गीय मुलांच्या, तसेच मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना राहण्याची व  भोजनाची  सुविधा, स्टेशनरी, सहल खर्च, गणवेश विनामुल्य व मासिक निर्वाह भत्ता दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार असल्याचे संबंधित गृहपाल यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments