Latest News

6/recent/ticker-posts

जनसामान्यांचे दिपस्तंभ- अशोकभैय्या पाटील निलंगेकर

जनसामान्यांचे दिपस्तंभ- अशोकभैय्या पाटील निलंगेकर


काँग्रेस पक्षातील निष्ठावंत राजकीय घराण्यामध्ये जन्म झालेले परंतु कसलाच प्रकारचा बडेजावपणा न करता जनसामान्यांमध्ये अगदी सहजपणे मिसळणारे, वावरणारे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेणारे थोडक्यात सांगायच म्हटल्यास जनसामान्यांचे दिपस्तंभ अशी ओळख असनारे महाराष्ट्र कॉंग्रेस कमीटीचे सरचिटणीस अशोकभैय्या पाटील निलंगेकर यांचा आज वाढदिवस...

अशोकभैय्या पाटील निलंगेकर ज्यांना मतदार संघातील जनता प्रेमाने भैय्या म्हणते अशा मनमिळावु, प्रेमळ स्वभाव असणाऱ्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा जन्म २९ जुलै रोजी झाला.... उच्चशिक्षीत व प्रत्येक क्षेत्राचा पुरेपुर सखोल अभ्यास असणाऱ्या अशोकभैय्या पाटील निलंगेकर यांचे प्राथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण संस्काराचे तथा शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे येथे झाले त्यानंतरचे बारावी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले व त्यानंतर स्थापत्य शास्त्रामधील (Civil) अभियांत्रीकी शिक्षण विर जिजामाता टेक्नीकल इंस्टीट्युट ऑफ मुंबई (VJTI) पार पाडले यानंतर मंत्रालयात लागलेली राजपत्रित अधिकारीच्या नौकरी स्व. निलंगेकर साहेबांच्या इच्छेखातर सोडून निलंगा येथील जन्मभूमी दाखल झाले. अशा उच्चशिक्षीत व्यक्तिमत्त्वाचे शिक्षण जरी बाहेर झाले असले तरी त्यांची आपल्या गावाशी, आपल्या वडीलांच्या मतदार संघाशी व मतदार संघातील जनतेशी नाळ ही कायम जुळुन असे...

महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान निष्ठावंत नेतृत्व असणारे, एक चारित्र्य संपन्न अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने नाव घेतल जात असे आपले वडील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची आपल्या मतदार संघातील नागरीकांशी असलेले आपुलकीचे संबंध त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीची असलेली त्यांची तळमळ, तळागाळामध्ये जावुन काम करण्याची त्यांची कार्यशैली ते बालपणापासुनच पाहत होते व आपल्या राजकीय कौशल्याचे धड़े अशोकभैय्या तेथुनच गिरवत होते. माझा आणि अशोक भैय्यांचा संपर्क माझ्या विद्यार्थी दशेत कॉलेज जीवनामध्ये आला मी त्यांच्याच महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे पदवी फार्मसीचे शिक्षण घेत असताना शैक्षणीक कामानिमीत्त, विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी संदर्भात माझा अशोक भैय्यांशी सतत नेहमी संपर्क यायचा त्यावेळी ते प्रचंड व्यस्त असूनही वेळातला वेळ काढून विद्याथ्र्यांच्या समस्या तात्काळ सोडवायचे त्यांची ही अडल्या नडल्यांची झटपट काम करन्याची शैली पाहुन माझ्यासह अनेक विद्यार्थी अशोक भैय्यांचे चाहते झाले ज्यांनी अशोक भैय्यांची काम करन्याची शैली पाहिले आहे ते देखील मधल्या काळामधे भाजपाच्या सत्तेला व अमीषांना भुलुन पक्षांतर करुन सूद्धा आजही खाजगी मधे अशोकभैय्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत असतानाचे मी माझ्या डोळ्याने पाहिले

आपले वडील महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, जलसंपदा मंत्री, महसुल मंत्री, पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा मुंबईकर लाईफस्टाईलमधे न रमता अभियांत्रीकी शिक्षणानंतर अशोकभैय्यांनी थेट निलंगा गाढले आपले मोठे बंधु तत्कालीन आमदार स्व. दिलीपभाऊ पाटील निलंगेकर यांच्या खांद्याला खांदा लावून ते मतदार संघातील जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र स्वतःला झोकुन दिले होते. त्यांनी १९८७ साली निलंगा तालुका कॉंग्रेस कमीटीच्या तालुका उपाध्यक्ष पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. वडील जरी राज्याचे त्यावेळी मुख्यमंत्री असले तरी त्यांनी तळागाळातुनच काम करुन स्वतःची छबी निर्माण केली आहे जरी त्यांच्या कारकीर्दीमधे दादासाहेबांचे योगदान असले तरी सुद्धा एका, सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे अशोकभैय्यांनी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली व अशोकराव पाटील निलंगेकर मित्रमंडळाचे

जिल्हाभर शाखा स्थापन करुन जिल्हात लखनगावे विस्तार वाढविला त्यानंतर त्यांनी १९९२ साली प्रथम निवडणुक लढविली व ते शैडोळ जिल्हा परिषद गटाचे विक्रमी मताधिक्याने जि. प. सदस्य झाले परंतु त्याकाळी जिल्हा परिषद सदस्यास पंचायत समीतीचा सभापती होता . येत असल्यामुळे त्यांनी निलंगा पंचायत समीती सभापती पद स्वीकारले पुढे ते १९९६ साली लातूर जिल्हा परीषदेचे अध्यक्ष झाले यानंतर सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद सन १९९० ते २०११ पर्यंत भुषविले. सन २००० ते आजतागायत २०२२ पर्यंत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत तसेच २००७ पासून ते आजतागायत लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत अशा प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी त्यामध्ये सतत वेळोवेळी नवनविन उपक्रम व संकल्पना राबविल्या आहेत यामध्ये कारखान्यातील कामगार वर्ग, खरेदी-विक्री संघातील व्यापारी वर्ग, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातुन गोरगरीब, कष्टकरी, मजुर वर्ग, निराधार

जणांच्या असंख्य समस्या सोडविणे, त्यांना मानधन, मोबदला मिळवुन देणे असे उपक्रम असतील अथवा सर्व व्यवहार पारदर्शक व सुरळीत पार पाडावे याकरीता बँकेतील संचालकांना टॅब वाटप, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमधे शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारच्या अडचणी न येऊ देता विनातक्रार कर्जमाफी करने, शेतकऱ्यांना कमीत कमी गैरसोयीमध्ये पीकविमा भरुन घेणे व मंजुर झालेला पीकविमा व्यवस्थीतरीत्या वितरीत करणे यासाठी वेळोवेली बँकेतील संचालक कर्मचारी वर्गास सुचना अशोकभैय्या करत असतात याची प्रचीती अनेक सामान्य मजुर,कष्टकरी, शेतकरी, व्यापारी वर्ग वेलोवेली बोलत असताना दिसून येत असते. कृषी उत्पन्न बाजार समीती निलंगाचे २०१६ पासुन २०२३ पर्यंत सभापती पद अशोकभैय्या भूषवत आहे. यामाध्यमातून तालुक्यातील लाखो शेतकरी बांधवांना विना अडचण विविध योजनांचा लाभ अशोकमैय्यांनी मिळवून दिला आहे तसेच २०००- २०१२ या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील सिनेट सदस्य (आदीसभा सदस्यत्व) अशोक भैय्यांनी भुषवीले आहे या कार्यकाळामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षा काळातील अडचणी सीनेट सभेमध्ये मार्गी लावणे, विद्यापीठ विभागातील शिक्षण पद्धतीमधील विविध अमुलाग्र बदल अशोकभैय्यांनी सुचविले असल्याची नोंद आजही विद्यापीठाच्या ईतीहासामध्ये नोंद असल्याचे पाहन्यास मिळते. यासोबतच महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणीक क्षेत्रामध्ये अतुलणीय असे योगदान दिले आहे. सहकार, व्यापार, राजकीय, शिक्षण अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये अतुल्य योगदान देत या क्षेत्रांमध्ये अनेक क्रांतीकारी बदल घडविले आहेत. काळानुसार माणसाने कात टाकत जावी जे नविन ते अंमलात आणून स्वतःची व समाजाची उन्नती साधावी असे अशोकभैय्या आम्हाला नेहमीच सांगत असतात त्यानुसार त्यांनी डिजीटल क्षेत्रावर भर देत

शिक्षण प्रणाली ही जास्तीत जास्त डिजीटल व अद्ययावत करता येईल यावर त्यांनी नेहमी भर दिला याची सुरुवात त्यांनी आपल्या शैक्षणीक संकुलातुन केली आहे. विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले अशोकभैय्या हे नेहमी सर्वात सोपी शिक्षण पद्धती असणाऱ्या प्रायोगिक शिक्षणावर जास्त भर देतात याची साक्ष त्यांच्या विविध शिक्षण संकुलांमधील प्रयोगशाळांमधून डीजीटल क्लासरुम मधुन दिसुन येत असते. दर्जेदार शिक्षण प्रणाली जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनामुल्य मिळाली पाहिजे यानुसार अशोकभैया सतत प्रयत्न वत असतात. १९९६ साली जिल्हा काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष पद त्यानंतर मागील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे सरचिटणीसपद सक्षमपणे भुषवत असताना मतदार संघातील अनेक नागरीकांच्या वीज, पाणी, रस्ता, आरोग्य,शेकडो निराधारांच्या पगारी चालू करणे, अपंगांना त्यांच्या सोयी सुविधा मिळवून देणे यासाठी ते अहोरात्र परीश्रम घेत असतात. निलंगा परीसरामध्ये एक अख्यायीका आहे की अशोक बंगल्यावर समस्या घेऊन गेलेला माणूस कधी आला नाही. नाखुश होऊन परत साध राहणीमान, उच्च विचार श्रेणी, जनसामान्यांच्या समस्या निरपक्षपणे सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणे, सत्ता असो किंवा नसो नेहमी सामान्य जणांसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेते, एका उच्चप्रतीष्ठीत राजकीय घराण्यामधे जन्म घेवून चळवळींतून, संघर्षातुन तयार झालेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणाऱ्या व जनसामान्यांच्या समस्यारुपी अंधकारामध्ये स्वतः कापरासारखे तेवत राहत समस्यांचे निराकरण करुन दिपोत्सव निर्माण करणारे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुखा:मध्ये साखरे सारखे अगदी सहगतीने विरघळणारे जनसामान्यांचे दिपस्तंभ सर्वदूर महती असणारे अशोकभैय्या पाटील निलंगेकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


सुधीर लखनगावे{नगरसेवक}

 नगरपंचायत कार्यालय, शिरूर अनंतपाळ जि. लातूर

भ्रमणध्वनी क्रमांक: 9022844417


Post a Comment

0 Comments