महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथे सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात
निलंगा: महाराष्ट्र विद्यालय,निलंगा येथील क्रीडाशिक्षक पाटील शिवाजी हे महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत प्रदीर्घ 28 वर्षे सेवा करुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याला अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचंगे आर. के. होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. माधवराव कोलपूके, महाराष्ट्र औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवतरावजी पौळ, प्रा. शेषेरावजी मोहिते-पाटील- माजी उपप्राचार्य शाहू महाविद्यालय लातूर, सुरेशराव पाटील - माजी मुख्याध्यापक महाराष्ट्र विद्यालय जेवरी तसेच महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी तसेच सतीश हानेगावे, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येने पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या पर्यवेक्षक सौ. देशमुख एस. डी. यांनी केले. पाचंगे व शाळेचे उपमुख्याध्यापक पवार डी. डी. व सौ. देशमुख यांनी सक्तारमुर्ती तसेच उपस्थित पाहुणे मुख्याध्यापक तसेच त्यांचे प्रतिनिधी यांचा सत्कार मोठ्या उत्साहाने केला. पाहूने मंडळीनी पाटील यांच्या कार्य कतृत्वार प्रकाश टाकला. सर्व उपस्थित पाहूने व नातेवाईक यांचाही पुप्ष देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत गीत गाऊन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन, पाटील सरांच्या जीवनावर प्रकाशज्योत टाकली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक पाचंगे यांनी केला पाटील यांचे उणीव शाळेला भासेल असे सांगून त्यांचे शाळेत नंतरही नेहमी स्वागतच आहे असे सांगून शाळेकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील सहशिक्षक अमरदीप पाटील यांनी सुंदर गीत गाऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगताप एस आर यांनी केले. तर आभार कांबळे एस.ए. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्काऊट विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली व सर्वांनी जड अंतःकरनाने सत्कारमुर्तींना निरोप दिला.
0 Comments